वानिवडे- पावणाई गावच्या पोलीस पाटीलांना पुरस्काराचे वितरण

देवगड ​: ​तालुक्यातील वानिवडे गावचे सुपुत्र तथा कै. नारायणशेठ तुकाराम बांदकर यांच्या स्मणार्थ नातू ओमकार रजनीकांत बांदकर यांच्या हस्ते वानिवडे – पावणाई गांवचे पोलिस पाटिल तथा गावचे सुपुत्र गुरूनाथ तुकाराम वाडेकर यांना ओमकार वधु – वर सुचक मंडळ तर्फे आदर्श पोलिस पाटिल पुरस्कार २६ जाने २०२० रोजी जि. प. आदर्श शाळा पावणाई नं १ या शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
​   ​या कार्यक्रमाला गुरूनाथ वाडेकर (पोलिस पाटिल),​ ​ओमकार बांदकर (ओमकार वधु – वर सुचक मंडळ – मालवण), परब सर (माजी मुख्याध्यापक), मालंडकर सर (मुख्याध्यापक), जायबाय सर (शिक्षक), बेले मँडम (शिक्षिका), कु बबन टुकरूल, ज्ञानदेव करंजे (जेष्ठ पत्रकार), पप्पू मासये (शिक्षण कमिटी उपाध्यक्ष) रविंद्र मेस्त्री (शिक्षण कमिटी अध्यक्ष), प्रसाद मेहत , रवि लाड व सर्व गांवचे लोक यावेळी उपस्थित होते.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: