मुख्यमंत्र्यांचा बैठकीवेळी पत्रकारांना प्रवेश नाही; पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते सायंकाळी ५ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. मात्र या बैठकीला पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील पत्रकारांना विशेष पास सुद्धा दिले आहेत. परंतु बैठक सभागृहात प्रवेश दिला होणार नाही, अशी माहिती उपलब्ध होतेय. पत्रकार परिषद नाही, तर मग पास का दिले, असा सवाल पत्रकार उपस्थित करीत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता आणि विविध अधिकारी, सचिव हे जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा होणार आहे. एक मिनी कॅबिनेट होईल असे सांगितले जात आहे. यासाठी कोकणवर विशेष प्रेम असणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहत असल्याने या मिनी कॅबिनेटकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्याला स्वतंत्र पॅकेज मिळेल, अशी अपेक्षा आहे. कोणत्या घोषणा होणार? काही प्रकल्प मार्गी लागणार का? सोनवडे घाटाचा प्रश्न मार्गी लागणार का? वंसंज्ञा, आकारीपड असे प्रश्न सुटणार का? विविध पाट बंधारे प्रकल्पांचे भावीतव्य काय असेल? चिपी विमानतळ वेळेत सुरू होणार का, याची पण प्रतिक्षस येथील जनतेला आहे. त्यामुळे आढावा बैठकीत काय चर्चा होते ? हे समजण्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश अपेक्षित आहे. माहिती कार्यालय याची बातमी करणार असले तरी ती शासकीय भाषेत असणार आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समजण्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून होत आहे. तसेच प्रवेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: