मराठमोळा अभिनेता निशांत प्रकाश पाठारे बनला पोलिस अधिकारी…

सिंधुदुर्ग : छोट्या पडद्यावरील मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये राधिका मसाले मधील ऑफिस स्टाफ , ललित २०५ मधील खऱ्या आदित्य भोसले ची भूमिका तसेच सावधान इंडिया मध्ये PSI ची भूमिका साकारणारा निशांत आता मराठी मालिकेत PSI ची भूमिका साकारणारा आहे.

फक्त मराठी वाहिनीवर लवकरच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे ब्रीद वाक्यावर आधारित स्पेशल पोलीस फोर्स नामक नवीन मालिका दाखल होत आहे.
या मालिकेची निर्माती आणि दिग्दर्शक नंदिता कोठारी करत आहे. या मालिकेत पाच पोलिसांची टीम आहे. त्यातील एका सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करताना निशांत दिसणार आहे. त्याच्या सोबत अभिनेता शरद गुरव, राजेंद्र जाधव आणि अभिनेत्री सानिका निर्मल पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी मालिकेत पहिल्यांदाच निशांत पोलिसाची भूमिका साकारत आहे. नुकतेच या मालिकेच्या शूटिंगला मालाड-मार्वे मध्ये सुरवात झाली आहे आणि ही मालिका फेब्रवारी महिन्यात प्रसारित होईल.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: