…मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे भाजप नेते नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : शिवजयंती एकदा साजरी करायची कि दोनदा याबाबत राज्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. आता मात्र महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे तिथीचा हट्ट सोडून ती १९ तारखेला साजरी करण्याचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने शिवसेनेला केलेल्या आग्रहानंतर भाजप नेते नितेश राणेंनी ट्वीट करुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी ची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!

एकदा काय तो दोन शिव जयंती चा वाद मोडून टाकाच !!

एक शिव प्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे !

हीच ती वेळ ! जय शिवराय!!!

यापूर्वीही नितेश राणे यांनी तिथीनुसार शिवजयंती रद्द करावी अशी मागणी केली होती. आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यांनीच ही मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: