देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय पोवाडा गायन स्पर्धेचं आयोजन

देवगड : शिवजयंती निमित्त देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय पोवाडा गायन स्पर्धा इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वा. होणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली असून ती पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक रोख रु.३०००/- व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रु. २०००/- व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रु. १०००/- व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ साठी दोन पारितोषिक ठेवण्यात आली असून प्रत्येकी रोख रु. ७५०/- व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी संघास प्रत्येकी रोख रु. ५००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक बिट मधून २ संघांना संधी मिळणार असून प्रथम येणाऱ्या १० संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी केदार सावंत- 9307338977, विजय कदम-9422584519 व अमित साटम-9764594100 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: