डॉ.सुनील आठवले यांना पुरस्कार जाहीर

देवगड : देवगडचे प्रतिथयश डॉक्टर सुनिल आठवले यांना वैद्यकिय क्षेत्रातील डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. सुनील आठवले यांनी लेखन, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. डॉ. आठवले यांना यापूर्वी डॉ. सेम्युअल हनिमान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेदलबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे. तसेच देवगड तालुक्यातील सामाजिक कामाची नोंद घेत यापूर्वी प्रोत्साहन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिका भेट, सुभाष मयेकर यांच्या हस्ते रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: