केंद्राच्या नुसत्या घोषणा, निधीच्या नावाने मात्र बोंब – अशोक चव्हाण

पुणे : केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या भारंभार घोषणा केल्या. मात्र, त्यासाठी लागणारा निधी न दिल्याने अनेक रस्त्यांची कामे रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

खेड शिवापूर रस्त्यावरील टोल नाक्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत विसंगती दिसून येत असल्याचे सांगून या टोल नाक्याला भाजपचा विरोध होता तर रस्ता तयार करतानाच त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, पुणे.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: