इलेक्ट्रीसिटीवरच्या शवपेटीकेचे १५ फेब्रुवारीला होणार लोकार्पण

देवगड : देवगड तालुक्यात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ‘डेड बॉडी’ व्यवस्थित ठेवणं ही एक मोठी समस्या होती. बहुतेकांचे नातेवाईक मुंबईला अथवा अन्य गावी असल्यामुळे ते येईपर्यंत ती डेडबॉडी बर्फात मीठ अथवा भुसा ठेवून ठेवावी लागायची. त्यालाही मर्यादा असतात आणि केवळ अंत्यदर्शन मिळावं म्हणून रात्री जीव धोक्यात घालून काही नातेवाईक मुंबईहून अथवा इतर गावातून देवगडला येत असत.
त्यादृष्टीने ‘डेड बॉडी’ ठेवावी यासाठी लाईफ लाईन फाउंडेशनतर्फे फायबरच्या पेटीची सुविधा देवगडला पुरवण्यात येत होती, परंतु त्याला देखील काही मर्यादा होत्या. ही अडचण लक्षात घेऊन देवगड येथील टेम्बवली गावातील एक सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक जयेंद्र राणे यांनी त्यांच्या D S RANE ट्रस्टतर्फे दोन वातानुकूलित शवपेटीका देवगडसाठी वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणाऱ्या लाईफ लाईन फाऊंडेशन ला दिल्या आहेत. इलेक्ट्रिसिटीवर चालणारी ही शवपेटीका टेम्पो मधून घरी नेता येऊ शकेल.
उणे साडेआठ तापमान ठेवता येत असल्यामुळे ८ दिवसांपर्यंत देह राहू शकतो.
या शवपेटिका डॉ. आठवले कॅम्पस देवगड येथे उपलब्ध रहातील. या शवपेटिकांमध्ये मिळणाऱ्यापैकी आर्थिक जमेचा काही भाग श्री शिवा पेडणेकर मित्रमंडळाला देण्यात येईल. DS Trust चे जयेंद्र राणे यांच्या हस्ते या शवपेटिकांचा लोकार्पण समारंभ शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉ. आठवले कॅम्पस येथे आयोजित केला आहे. ह्या समाजोपयोगी उपक्रमांना उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शवपेटीसाठी संपर्क : शकूर पिरखान 9420305335, सचिन आयरे 9158744363, शिवप्रसाद पेडणेकर 9422584665.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: