आचिर्णे धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी शिवसेना नेते अतुल रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, तालुका प्रमुख मंगेश लोके, जि.प. सदस्या पल्लवी झिमाळ यांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून व आचिर्णे धनगरवाडी ग्रामस्थांची गौरसोय लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेमधून या रस्त्यासाठी १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या कामाचा शुभारंभ प्रसंगी शिवसेना नेते अतुल रावराणे, तालुका प्रमुख मंगेश लोके, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी उपसरपंच महेश रावराणे, लोरे उपसरपंच दीपक पाचकूडे, ग्रा.पं. सदस्य संतोष कडू, उत्तम सुतार, संतोष बोडके, संदेश उर्फ बाबू रावराणे, आबु गुरव, दादा सावंत व गावातील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी धनगरवाडी ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री दिपकभाई केसरकर, खासदार विनायक राऊत साहेब व शिवसेना नेते यांचे विशेष आभार मानले.

उमेश बुचडे, कोकण नाऊ, वैभववाडी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: