अशोक दाभोलकर याना महाराष्ट्र लोकरत्न

वेंगुर्ले : श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय विचार साहित्य संमेलनामध्ये सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष सेवेबद्दल ‘महाराष्ट्र लोकरत्न पुरस्कार २०२०’ या पुरस्काराने वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र अशोक दाभोलकर याना सन्मानित करण्यात आले. अशोक दाभोलकर यांचे कार्य लक्षात घेऊन समाज गौरव शैक्षणिक समामाजीक बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर, शाहू शिक्षण संस्था संचलित पंढरपूर, इचलकरंजी व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून ‘महाराष्ट्र लोकरत्न ‘ या पुरस्काराने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वेंगुर्ले

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: