हिंदळेतील युवकाची मुंबईत आत्महत्या

Sharing is caring!

देवगड : तालुक्यातील हिंदळे येथील प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र हिंदळेकर (वय २६ वर्षे) या युवकाने नवी मुंबई ऐरोली येथे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
          याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंदळे येथील प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र हिंदळेकर हा युवक नोकरीनिमित्त मुंबईमध्ये ऐरोली येथे फ्लॅटमध्ये मित्रासमवेत राहत होता. शुक्रवारी त्याचा मित्र कामावर गेला. मात्र प्रथमेश फ्लॅटमध्येच होता. त्याचा मित्र सायंकाळी सहा वाजता कामावरून माघारी ऐरोली येथे आल्यानंतर खोलीतच गळफास लावलेल्या स्थितीत प्रथमेश दिसला. प्रथमेश याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमेश याने जे.जे. आर्ट स्कूलमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो नोकरी करीत होता. मिठबाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र हिंदळेकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता. राजेंद्र व त्यांची पत्नी ही जामसंडे सहकारनगर येथे राहत असून प्रथमेशच्या दुर्दैवी मृत्यूने हिंदळे गावासहित देवगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: