स्वाभिमानच्या विधानसभा मतदार संघाच्या युवा अध्यक्षपदी अमित साटम

Sharing is caring!

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या युवा अध्यक्षपदी अमित साटम यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. देवगड तालुका महाराष्ट्र स्वाभिमान युवा उपाध्यक्ष असलेल्या अमित साटम यांनी ग्रुप ग्रामांचायत शिरगांव-शेवरे चे सर्वात तरूण सरपंच म्हणून सरपंचपद भुषवले आहे. ओम गणेश मंडळ, सुदर्शन प्रासादिक भजन मंडळ, हनुमान सेवा मंडळ, नाईक साटम समाजन्नोती युवक मंडळ आदी सामाजिक संस्थामध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्रातील संस्थांशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यांची या पदावर निवड झाल्याचे समजताच शिरगांव येथील युवकांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष केला. ओम गणेश मंडळाच्या कार्यकतर्यानी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित साटम म्हणाले, खासदार नारायण राणे यांची विचारधारा,आमदार नितेश राणे यांची मतदार संघातील विकास कामे युवकापर्यत पोहचवणार यासाठी सर्वाच्या सहकार्याने संघटना वाढीसाठी प्रयत्नशिल राहून खासदार नारायण राणे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावेन. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप साटम,विजयकुमार कदम,आबा चव्हाण,युधिराज राणे,ओमकार साटम,विशाल कुवळेकर,आदित्य तावडे,अश्विनी साटम,प्राची साटम,पसाद परब,ओमकार तावडे,ऋषिकेश माळवदे,चिन्मय तावडे,भक्ती पोरे,संगीता जामसंडेकर,श्रृतिका साटम आदीसह युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: