श्री देव वेताळ मंदिराचा ११ रोजी वर्धापन दिन 

Sharing is caring!

जैतापूर : राजापूर तालूक्यातील जैतापूरचे ग्रामदैवत श्री देव “वेताळ ” मंदिराच्या जिर्णोद्वाराचा पाचवा वर्धापन  दिन ११ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
राजापूर तालूक्यातील जैतापूरचे “श्री देव वेताळ मंदिर “प्रसिध्द आहे. या मंदिराचे पाच वर्षांपूर्वी नुतनिकरण करण्यात आले होते. या मंदिराचा पाचवा वर्धापन दिन ११ मे रोजी साजरा होत आहे. श्री देव वेताळ मंदिराच्या जिर्णोदाराचे औचित्य साधत प्रती वर्षाप्रमाणे चैतंन्य संस्था प्रेरीत त्रीवेणी महिला संघाच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण मंदिर परिसर साफ केल्याने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. याच भागातून सकाळी श्री देव वेताळाचा सुवर्णजडीत पालखी  मिरवणूक सोहळा सुरू राहणार आहे. त्या नंतर पुण्याहवाचन, देवता स्थापना स्वाहकार, पूर्ण आहूतीसह अन्य विधिवत धार्मिक विधि पार पडल्यानंतर दुपारी माहाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून महिलांसाठी  हळदिकुंकु व शालेय मुलांकरीता विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी ॐ नम:शिवायचा सामुहिक जप सूरू राहणार आहे. विविध सांस्कृतिक  कार्यक्रम तसेच विविध  गुणदर्शनाच्या कार्यक्रमाबरोबरच नाट्यछटा तसेच ‘आम्ही सारे’ गृपच्या वतीने वस्त्रहरण फेम कलाकार सुनिल करगुटकर यांची एकांकिका सादर होईल. कार्यक्रमाच्या मध्यानतराच्या वेळी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे बक्षीस समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मांजरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ,वेताळ भक्त मेहनत घेत आहेत.

सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: