वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

Sharing is caring!

सिंधुदुर्गनगरी : कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची गहाळ झालेली रोख २० हजार रक्कम व दागिने शोध मोहीम राबवून शोधून काढले व परत केले. ही घटना सोमवारी रात्री १:०० वाजता घडली.
              खालापूर टोल नाका येथे विशेष अभियान असल्याने कसाल महामार्ग पोलीस विभागातील एकनाथ मुसळे, जयशंकर धुरी, सचिन करवंजे हे तीन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान, नरेश राजपुरोहित हे परिवारासह बंगलोर ते राजस्थान असे चारचाकी वाहनाने (जीए ०५ डी ८७०५) प्रवास करीत असताना, बोरघाट येथे काही कामानिमित्त थांबून त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केल्यावर त्यांच्या वाहनातून दागिने व २० हजार रुपये असलेली पर्स पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी महामार्गावरील खालापूर टोल नाका येथे दिली. सहाय्यक फौजदार जयशंकर धुरी व हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी, एकनाथ मुसळे व सचिन करवंजे यांनी ती पर्स शोधण्यासाठी मोहीम राबवली असता त्यांना घाटात रात्री १:०० च्या दरम्याने ती पर्स अखेर सापडली.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: