रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण जाहीर

Sharing is caring!

मुंबई : रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षातील पहिले तिमाही पतधोरण जाहीर केले असून सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये कपात केला आहे. रेपो रेट मध्ये  ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली असून, रेपो रेट आत ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्के झाला आहे. 
           रेपो रेट मध्ये कपात झाल्याने कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जदारांचा मासिक हफ्ता काहीसा कमी होणार आहे. शिवाय ऑटो लोन तसेच पर्सनल लोनाही स्वस्त होणार आहे तसेच होम लोन घेतलेल्यांना देखील याचा फायदा होणार आहे. रिव्हर्स रेपो रेट आता ५.७५  टक्के असणार आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर ७.२ टक्के राहील असा अंदाज आहे. 
           फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये कपात करत रेपो रेट ६. टक्क्यांवर आणला होता. आजच्या कपातीनंतर, गेल्या तीन महिन्यात रेपो रेट मध्ये ०.५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. 
 
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: