राज्यभरात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू

Sharing is caring!

मुंबई : राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अद्यापही तापमान किती वाढेल, याची खात्री देता येत नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी पायाने चाळीशी गाठली असून यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताची समस्या वाढत आहे. याच समस्येतून १५ मार्चपासून आतापर्यंत ७ जणांचा जीव गेला असून २५६ लोकांवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत, अकोला, नागपूर, बीड, धुले, औरंगाबाद या जिल्ह्यांतील लोकांसाठी वाढलेले ऊन ही सर्वात मोठी समस्या आहे. नागपूरमध्ये राज्यात सर्वात जास्त उष्माघाताचे नागरिक आढळले आहेत. नागपूरमधील १०७ रुग्णांना वेगवेगळ्या उष्माघाताच्या समस्येमुळे दाखल केले गेले आहे. त्यापाठोपाठ अकोल्यात १०३ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर लातूर आणि नाशिकमध्येही रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे यावर बोलताना राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राज्यात वाढत्या तापमानामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची प्रकरणे वाढत आहेत. नागपूरमध्ये सर्वात जास्त रुग्ण असून त्यामुळे आरोग्य सेवा पुरवणा-या सर्व संस्थांना आम्ही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची आरोग्य सेवा प्रणाली सज्ज रहावी हा यामागील उद्देश आहे. तसेच, गॅस्ट्रोएन्टेरायटिस असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.
ब्युरो न्युज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: