महिन्याच्या १ तारखेस पेन्शन न मिळाल्यास आंदोलन; पेन्शनर्स असोसिएशनचा इशारा

Sharing is caring!

कुडाळ : जि. प. प्रशासनाच्या कारभारामुळे सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी व शिक्षकांना कधीही एक तारीखला पेन्शन मिळत नाही. शिवाय ज्या सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत आहेत, त्यांच्या खात्यावर दहा-बारा तारीखपर्यंत पेन्शन जमा होते.
पेन्शन अदालतमध्ये हा प्रश्न अनेकवेळा मांडला जाऊन सुद्धा प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही. म्हणून १ तारीखला पेन्शन न मिळाल्यास जूनमध्ये जिल्हा परिषद भवनासमोर पेन्शनर्स असोसिएशन तर्फे लक्षवेधी आंदोलन करून सर्व पेन्शनर्स आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील, असा एकमुखी ठराव जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन च्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला.
१ जुलै १९७२ नंतर सेवेत दाखल झालेल्या परंतु अप्रशिक्षित शिक्षक म्हणून जे शिक्षक सेवानिवृत्त झाले, त्यांना शासनाने
सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नाकारले होते. परंतु, राज्य पेन्शनर्स असोसिएशन तर्फे उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल करून दाद मागितली होती. त्याचा निकाल दोन्ही वेळा संघटनेच्या बाजूने दिला गेला आहे, याची माहिती पेडणेकर यांनी दिली. यावेळी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अखेरचा जमाखर्च कांबळी यांनी सादर केला. त्यावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात आली. ज्या सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षकांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेत, अशा २३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
ही बैठक जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या कार्यालयात झाली. उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, सरचिटणीस शरद कांबळी, सल्लागार चंद्रकांत अणावकर, सी.टी कोचरेकर, आर. आर. दळवी, रावजी यादव, उषा आठले, शैलजा चुबे आदी सदस्य उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: