महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणारे जिद्दी तरूण

Sharing is caring!

“करिते का कधी खंत, सरिता, करिते कां कधी खंत,
कडेकपारीतुनी खळाळत आक्रमिते निजपंथ.”
या उक्तीप्रमाणे काही माणस अडचणींवर मात करून स्वतःची वात स्वतःच तयार करतात. असं अदम्य जिद्दीने काम करून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणारे दोन युवक. या दोन युवकांच्या गरुड भरारीच्या प्रवासाची काहाणी मोठी रोमहर्षक आहे. सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत या दोन तरुणांच्या ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ची यशोगाथा पाहण्यासारखी आहे.
आपण कथा-कादंबऱ्या, चित्रपटातून अशा अनेक रोमहर्षक कहाण्या पाहतो. तसच सचिन ओटवणेकर हा आपल्याबरोबर भविष्याची सोनेरी स्वप्ने घेऊन स्वतःचे भविष्य घडवायला मुंबई सारख्या महानगरीत गेला. सोबत होती ती सोनेरी स्वप्न. आणि आपली स्वप्न साकार करण्यासाठी अपार मेहनत घेण्याची दुर्दम्य जिद्द ! देऊळवाडा मालवण येथून शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथून शिक्षण पूर्ण करून तो मुंबईला गेला. एखाद्या क्षेत्रात उंच भरारी मारून गगन स्पर्श करण्याची उत्तुंग स्वप्न हृदयात होती. त्यासाठी काहीही कष्ट घेण्याची मानसिक तयारी होती.
उरात जिद्द, कष्टांची तयारी, मनगटात सामर्थ्य, महत्वाकांक्षा इत्यादी गुणांची शिदोरी घेऊन मुंबईच्या महानगरीत प्रवेश केलेल्या सचिनने सुरुवातीला खडतर प्रवासाला सुरुवात केली. वसईमध्ये काही वर्षे वातानुकुलीत जिम चालवित होता. याच जिममध्ये शरीरयष्टी कमविण्यासाठी विजय राजपूत नावाच्या तरुणाने प्रवेश अर्ज भरला. विजय हा राजस्थानी तरुण वसईमध्ये राजस्थानी मार्बल, टाईल्स आणि इलेक्ट्रिक हार्डवेअर विक्री करणारा व्यावसायिक म्हणून परिचित होता. या निमित्ताने ओळख झालेले सहीन आणि विजय विचारांच्या तारा जुळल्या आणि एकमेकांचे सच्चे मित्र बनले.
याच मैत्रीतून बांधकाम व्यवसायाच्या विचाराची भव्य इमारत उभी राहिली. सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत या दोघांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन ‘ओट्रा’ बनल. अर्थातच ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.दोनही मित्रांनी शिक्षणातून आणि अनुभवातून मिळवलेले ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिक प्रयत्न इत्यादी अनेक गुणांमुळे अल्पावधीतच गृहनिर्माण क्षेत्रात ‘ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर’ हे लोकांसाठी एक विश्वसनीय नाव बनल २००३-०४ मध्ये बांधकाम क्षेत्रांत भागीदारीने प्रवेशकर्ते झालेले सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत हे अल्पावधीतच बिल्डर बनले. अनेक समस्या, प्रतिकूलता यावर या दोघांनी माट केली. ग्राहकांच्या गरजा, आवडी-निवडी त्यांनी समजून घेतल्या. ग्राहकांच्या विश्वासात कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे अल्पावधीतच ‘ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर’ हे ग्राहकांच्या पसंतीचे नाव बनले.
सातत्यपूर्ण मेहनत, सखोल अभ्यास, जिद्द, प्रामाणिकपणा इत्यादी गुणांच्या शिदोरीवर हे दोन तरूण बांधकाम केंद्रासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही अल्पावधीतच यशस्वी झाले. सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत या दोन तरुणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस फाटा येथे वास्तू प्रकल्प बांधून पूर्णत्वास नेला. ओरोस नगरीत ओरोस फाटा येथे सध्या मोक्याच्या ठिकाणी ‘ओट्रा बिझनेस पार्क’ उभारण्यात येत आहे. त्यारुपान दोन जिद्दी, मेहनती तरूणांच सुंदर स्वप्न साकारत आहे.
ओट्राच्या बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत एका वृत्त समुहाने सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

वृंदा कांबळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: