मळगाव येथे  काजू जी आय मानांकन कार्यशाळा संपन्न

Sharing is caring!

सावंतवाडी  : येथील  काजूचा कांदा होऊ देऊ नका, असा गर्भित इशारा जी आय मानांकनाचे आंतरराष्ट्रीय जाणकार गणेश हिंगमिरे यांनी दिला आहे. सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे शनिवारी झालेल्या काजू बी मानांकन कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी आणि काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी आय मानांकनासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य देईल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या निमित्ताने दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने मळगाव येथे या काजू जी आय मानांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या  कार्यशाळेचे उदघाटन गणेश हींगमीरे यांच्या हस्ते झाले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष  सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक गुरूंनाथ पेडणेकर, व्हिक्टर डॉन्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, आत्माराम ओठवणेकर, प्रकाश गवस, दादा साईल, विद्याप्रसाद बांदेकर, भगिरथ प्रतिष्ठनचे डॉ. प्रसाद देवधर, कृषी उत्पन्न  बाझर समिती अध्यक्ष तुकाराम साईल, मनीष दळवी, जॉकी डिसोझा, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. गणेश हिंगमीरे यांचा  जिल्हा बँक मार्फत सत्कार करण्यात आला.

काजू उत्पादनाला अधिक किमत जागतिक बाजारपेठेत मिळवायची असल्यास आपण जी आय मानांकन प्राप्त करायला पाहिजे, असे गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.  काजू बागायतदार, शेतकरी यांनी एकजूट दाखवली नाहीतर काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.  काजू उत्पादक शेतकरी संघटना मजबूत असेल तरच  आपण आपलं उत्पादन, गुणवत्ता  टिकवू शकतो असे मत  गणेश हिगमीरे यांनी व्यक्त केले.
जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेली आज कोकणात अनेक उत्पादन आहेत.  यात कोकमला तर अफाट मागणी आहे.  वजन कमी करण्याचा गुणधर्म यामध्ये आहे.  अनेक कंपन्या  या कोकम बी साठी मागणी करतात. आज कोकणातील हापूस आंबाच्या नावावर बाहेरचा आंबा विकला जातो.  त्यामुळे आंब्याचे दर सध्या घसरले आहेत.  त्यामुळे  आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण केल्यास जागतिक बाजारपेठेमध्ये याची मागणी वाढू शकते.  असे देखील  हिंगमिरे यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  १० ते १२ हजार जी आय मानांकन प्राप्त काजू बागायतदार आहेत. काजू विक्री व्यवसायिक, काजू प्रोसेसिंग युनिट यांच्या संस्था स्थापन करून जिल्ह्यातील  काजू बी ला जिल्हा  बँकमार्फत दर्जात्मक ब्रँड मिळवून देणार असल्याचे जिल्हा बँकचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील  काजू बागायत शेतकरी वर्गाला  जिल्हा बँक प्रति काजू झाड ६००/- रु तर  जी आय मानांकन प्राप्त काजू झाड ला ७०० रु कर्ज देणार असल्याची घोषणा  जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी केली.

यावेळी  डॉ प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शरद सावंत यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: