नाटे येथे दुष्यन्त पाथरे  यांच्या सी लायन जिमचे उदघाटन 

Sharing is caring!

जैतापूर : आजकालच्या या धावपळीच्या बिझी श्येड्युलमुळे  स्वतःकडे, स्वतःच्या  प्रकृतीकडे कोणालाच वेळ नसतो. परिणामी शरीर कमजोर होतं आणि  रोगप्रतिकारक्षमता खालावते. मग, विविध प्रकारच्या आजाराला तोंड द्यावे लागत. हे जर टाळायचं असेल तर गरज आहे ती व्यायामाची. व्यायामान शरीर सुदृढ आणि  निरोगी राहत. म्हणूनच प्रत्येकानं  प्रत्येक मनुष्यान व्यायामाकडे गरज म्हणून न पाहता, त्याकडे सवय म्हणून पहावं असा संदेश देत राजापूर तालुक्यातल्या नाटे शहरात तिथलाच स्थानिक तरुण  दुष्यंत पाथरे यान  “सि लायन फिटनेस अँन्ड जिम” सुरू केलीय. अलीकडेच या जिमच उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झालं.
नाटे इथं सुरू झालेल्या सि लायन फिटनेस अँन्ड जिमचा शुभारंभ दुष्यंतची आज्जी  श्रीमती गिता दिनानाथ पाथरे यांनी फित सोडून आणि दिप प्रज्वलन करून केले.  महाराष्ट्र श्री बाॅडी बिल्डर किताबप्राप्त पप्या मानकर, नाटेचे व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर, राजापूरचे माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर, माजी नगर सेवक अभय मेळेकर, हौशी शरीर सौष्ठव संघटना राजापूरचे अध्यक्ष आणि  रत्नागिरी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, अजगर बांगी, राष्ट्रीय खेळाडू संदिप चव्हाण, कृष्णा करंबेळकर, भाई पाथरे असे  मान्यवर उपस्थिति होते.
दुष्यंत पाथरे हा हाॅटेल मेनेजमेंटचा डिप्लोमा घेऊन  स्वत:च्या हाॅटल व्यवसायाबरोबरच वडिल संदेश पाथरे यांना व्यवसायात मदत करत आहे. त्याचवेळी  त्याने  मुंबईत  जिमचे ट्रेनिंग घेउन त्याच प्रशस्तिपत्र प्राप्त केले आहे.
जिम हा प्रकार हेल्थ क्लबला समांतर झाला असून डाएटच्या टिप्स, योग यांचा त्यात अंतर्भाव झाला आहे. जिम हा प्रकार सर्वसामान्यांसाठी नसून उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांसाठीच आहे असा एक समज न ठेवता आजकाल तरुणाई मोठय़ा संख्येने जिममध्ये जाताना दिसत आहे. नाटे पंचक्रोशीतले  तरूण आणि  तरूणीं तसेच  सर्वसामान्यांना जिमचा वापर करता येईल अशी अद्ययावत जिम मशिन बसविल्या आहेत. जिम अद्यावत बनविण्यासाठी  दुष्यंतला मुंबईचे  मामा महेश नारकर आणि  सचिन नारकर यांचा मार्गदर्शन लाभल आहे.
सी लायन जिमच्या शुभारंभावेळी महाराष्ट्र श्री किताब प्राप्त  बाॅडिबिल्डर पप्या मानकर, अलोक बैद्य, महेश मेढगे, वृषिकेश देसाई, बाळा मेढगे आणि इतर बाँडी बिल्डर यांनी मुंबई इथून  या कार्यक्रमला उपस्थित राहून  सर्वांचे लक्ष वेधल.

हिंदि राष्ट्रभाषा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका राजश्री नारे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचे वय वर्षे ९७ मधिल लता दिदिंच्या वाढदिवसा वेळी काढलेले उद्दगार आपल्या शब्दात व्यक्त करत पाथरे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.  तर सि लायन जीम मध्ये महिला म्हणून प्रथम प्रवेश घेणा-या सायली  लाड यांनी आपल मनोगत व्यक्त करताना महिलांसाठीसुद्धा जिमची किती आवश्यकता आहे हे अधोरेखित केलं.  जैतापूरच्या सरपंच रेखा कोंडेकर, नाटे व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, शिव संघर्ष संघटना नाटेचे अध्यक्ष मनोज आडविरकर, पत्रकार राजन लाड यांनी संदेश पाथरे यांच्यातल्या  व्यासायिक धडपडी विषयी माहिती दिली.

जिममध्ये उत्तम असे प्रशिक्षण दिले जात. यात प्रत्येकाच्या डाएटचाही विचार केला जातो. फ्री वेट स्टेशन, मल्टिजिम, टोटल जिम कन्सेप्ट, स्मिथ मशीन मल्टिकॉम्बिनेशन, ट्रेडमिल्स, रोअर, स्टेशनरी बाइक्स इत्यादी उपकरणांचा समावेश जिममध्ये असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून व्यायाम केला जात आहे. पहाटे  पाच ते रात्री  दहा वाजेपर्यंत जिम खुली राहणार आहे असं सांगून दुष्यन्त   पाथरे यांनी जिममध्ये प्रवेश घेण्याचे सर्वाना आवाहन केलं.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रत्नागिरी मधिल सुप्रसिद्ध नाट्य कलाकार अनुया बाम यांनी केल. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करत असं म्हणतात. म्हणूनच दुष्यंत पाथरे याने सी लायन जिमच्या माध्यमातून नाटे परिसरातल्या लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा सर्वानी नक्कीच लाभ घेऊन स्वतःला फिट ठेवल पाहिजे, एवढंच या निमित्ताने म्हणावंसं वाटत.

सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: