नरेंद्र मोदी यांचे ‘मिशन शक्ती’ यशस्वी

Sharing is caring!

नवीदिल्ली : भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवलेली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाच्या सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असेही यावेळी मोदी म्हणाले.
बुधवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे, असे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मोदी नेमके काय बोलणार, याकडे देशभराचे लक्ष लागून होते. अखेर दुपारी मोदींनी देशवासीयांना संबोधित करत  मोदींनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या मिशन शक्तीविषयी माहिती दिली.
या अंतर्गत भारताने अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची माहिती मोदींनी दिली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं सॅटेलाईट नष्ट केल्यानंतर भारत अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे. याआधी अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांनीच ही कमाल करून दाखवली होती. लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारताने अँटी सॅटेलाइट मिसाइलद्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) एक उपग्रह पाडले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. अँटी सॅटेलाइट मिसाइलमुळे देशावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे. तसंच आजच्या चाचणीमुळे भारत सुरक्षित राष्ट्र बनला आहे अशी ग्वाहीसुद्धा मोदींनी दिली आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवीदिल्ली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: