दोडामार्ग बाजारपेठत पहाटे अग्नितांडव; लाखो रुपयांचे नुकसान 

Sharing is caring!

 

दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत पहाटे लागलेल्या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले. राजेंद्र राधाकृष्ण बोन्द्रे आणि आनंद मनोहर बोन्द्रे यांची इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली.
अनेकांनी आग वीझवण्याचा प्रयत्न केले  पण ते  अपुरा पडले.त्या इमारतीत असलेली जनता नागरी सहकारी पतसंस्था आणि सहा दुकाने अग्निताण्डवात नाहीशी झाली. त्यात एक भुसारी दुकान, मिठाईचे दुकान, स्टेशनरीची दोन दुकाने, एक कपडे इस्त्रीचे दुकान, एक ब्यूटी पार्लर आणि शिलाईचे दुकान आतील सर्व साहित्यासह जळून खाक झाले. त्या घरात राहणारे वयोवृध्द  राधाकृष्ण बोन्द्रे यांना प्रसंगावधान दाखवून स्थानिकांनी घराबाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पहाटे तीन सव्वा तीनच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात आले. डिचोली गोवा येथून आलेल्या दोन अग्निशामक बंबाने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सावंतवाडी आणि वेंगुर्लेतील बंब उशिरा पोचल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: