तिथवली येथे मोफत आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद; वैश्य सभा, मुंबई यांचे आयोजन 

Sharing is caring!

खारेपाटण : मुंबईच्या वैश्य सभा संस्थेच्या विद्यमाने कणकवली तालुक्यात तिथवली इथं शनिवारी  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले  होत.  सदर शिबिरामध्ये डेरवण येथील  बी.के .एल वालावलकर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून कॅन्सर तपासणी, हृदय तपासणी, स्त्रियांचे आजार, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा तसेच इतर शारीरिक आजाराची तपासणी करण्यात आली. या शिबिराला तीथवली आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबईच्या वैश्य सभा  संस्थेच्या वतीने तिथवली येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर मध्ये आयोजित केलेल्या हा शिबिराला सकाळी  साडेनऊ वाजता सुरुवात झाली. हे शिबीर मोफत असल्याने अनेक गरजू रुग्णांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. डेरवणच्या बीकेएल वालावलकर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर्सनी आरोग्य तपासणी केली.

या आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, हृदय तपासणी, स्त्रियांचे आजार, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा,  इतर शारीरिक आजार अशा सर्व आजारांवर तज्ज्ञ  डॉक्टरच्या वतीने रुग्णाची तपासणी करण्यात आली. वैश्य सभा मुंबई संस्थेच्या विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा लाभ तिथवली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. सुमारे शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याबद्दल संस्थेचे कार्यवाह  स्वप्नील बोभाटे यांनी सर्वांचे  आभार मानले. या शिबिराला वैश्य सभा मुंबईचे सर्व पदाधिकारी, तसेच डेरवण हॉस्पिटलचे  डॉक्टर आणि  तिथवली ग्रामस्थ उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ खारेपाटण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: