तंदुरुस्तीसाठी “मारुती फिटनेस सेंटर”

Sharing is caring!

खारेपाटण : हेल्थ इज वेल्थ म्हटलं जात. म्हणूनच खारेपाटण आणि पंचक्रोशीतल्या सर्वांना व्यायामाची आवड आणि तंदुरुस्तीची जाणीव व्हावी यासाठी मंदार मारुती राणे यांनी खारेपाटणमधेच भव्य असं  अत्याधुनिक स्वरूपाचं  मारुती फिटनेस सेंटर सुरू केलं. गेली तीन वर्ष या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून मंदार राणे हे सर्वाना तंदु

रुस्तीचे धडे देत आहेत. मारुती फिटनेस सेंटर मध्ये सर्व प्रकारच्या मशिनरी उपलब्ध असल्यान जास्तीत जास्त लोकांनी यांचा लाभ ग्यावा असं आवाहन मंदार राणे यांनी केलं आहे. व्हिओ
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात आपली तंदुरुस्ती राखण खूप महत्वाचं आहेत. शहरात त्यासाठी वेगवेगळ्या व्यायामशाळा जिम असतात. पण छोट्या शहरात किंवा शहर वजा गावात अशा सुविधा सहसा आढळत नाहीत. पण व्यायामाचं महत्व ओळखून खारेपाटण पंचक्रोशीतील सर्वांचं शरीर निरोगी आणि मजबूत व्हावं यासाठी २२ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार मारुती राणे यांनी खारेपाटणमधेच रामेश्वर नगरमध्ये असलेल्या सुनील तावडे कॉम्प्लेक्समध्ये मारुती फिटनेस सेंटर यान नावानं अत्याधुनिक आणि भव्य जिम सुरु केली. आज तीन वर्षात या जिम मध्ये व्यायामासाठी अनेक आधुनिक मशिनरी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांग सुंदर व्यायाम होतो.
मारुती फिटनेस आता आदर्श तंदुरुस्तीच ठिकाण बनलंय. अगदी चौवीस तास सुरु असलेल्या या जिम मध्ये प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जात. वजन विषयक टिप्स दिल्या जातात. संघ व्यवस्थापन, ग्रुप ट्रेनिंग, गट शिक्षण, संतुलित आहार, शरीर फुलवणे असे धडे इथं दिले जातात. वजन कमी करण्यासोबतच वजन कमी करणे, मसाज, न्यूट्रीशियन डाएट अशा सुविधा इथं उपलब्ध आहेत. फिटनेसच्या ध्येय्यापर्यंत पोहोचण्यासाठी संतुलित आणि पोषक आहाराचं नियोजन इथं केलं जात. तुमची क्षमता वाढवली जाते  आणि महत्वाचं म्हणजे हृदयाच्या तंदुरुस्तीविषयी मार्गदर्शन केलं जात. इथे दाखल होणाऱ्या प्रत्येकाकडे वैयक्तिरित्या लक्ष दिल जात असल्याने तीन वर्षात मारुती फिटनेस सेंटरवरचा सर्वांचाच विश्वास कमालीचा  वाढला आहे. म्हणूनच फिटनेस राखायचा असेल तर मारुती फिटनेस सेंटरला एकदा  भेट द्यायला काय हरकत आहे?

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ बिझिनेस वार्ता, खारेपाटण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: