जैतापूर येथील भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळाला भाविकांची गर्दी 

Sharing is caring!

 

जैतापूर  : राजापूर तालुक्यात जैतापूर आगरवाडी येथील मांजरेकर बंधूंचा भवानी मातेचा प्रसिद्ध त्रैवार्षीक गोंधळ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या गोंधळासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. संपुर्ण वाडी मध्ये जोगवा मागून झाल्यावर आणि  सर्व देवतांना गाऱ्हाणी  झाल्यावर गोंधळाला सुरूवात झाली.
जैतापूर आगरवाडीतील मांजरेकरांचा त्रैवार्षीक गोंधळ प्रसिध्द आहे. गोंधळाच्या दिवशी जैतापूर पंचक्रोशीतील देवतांना या गोंधळाचे आदर पुर्वक निमंत्रण देण्यात येते. संपुर्ण आगरवाडी भागात दुपारनंतर प्रत्येकाच्या घरी जोगवा मागीतला जातो. जोगवा मागून झाल्यावर देवीच्या गोंधळाच्या पुजेची तयारी करण्यात येते. सर्व मांजरेकर कुटुंब, ग्रामस्थ, मानकरी, पोलीस पाटिल यांचा हुकुम घेउन मग काहि वेळातच गोंधळाला सुरूवात होते. सुरुवातीला  घरातील देवीला गाऱ्हाणं घालण्यात  येते. त्या नंतर गोंधळ मांडतात मांडून त्या ठिकांणी देवीला मानाचे गाऱ्हाणं घालण्यात येत.

दर तिन वर्षाने साई भक्त विलास ऊर्फ बाळू मांजरेकर यांच्या निवासस्थानी देवीचा गोंधळ मांडण्यात  येतो. संबळ वाजू लागली कि आपेआपच हजारो भाविक हा गोंधळ पाहण्याकरिता करीता तसेच गोंधळात घातलेली खूण  अचूक काढली जाते का हे प्रत्यक्ष पाहण्याकरीता भाविक हजेरी लावतात. संबळ वाजवणारे हे गोंधळी परगावातून आणले जातात. मांजरेकर बंधू एक महिना ह्या देवीच्या गोंधळ ऊत्सवाची तयारी करत असतात. या उत्सवाला मुंबईकर चाकरमानी आवर्जून येतो. चाळीस वर्षा पूर्वी पासून काहि कारणास्तव हा देवीचा गोंधळ बंद होता. परंतु पुन्हा नव्या उमेदिने सन २००३ पासून देवीचा गोंधळ सूरू झाला.  त्या मुळे मांजरेकर कुटुंबातील सर्व मंडळी तसेच मुंबईतील प्रख्यात बिल्डर राजेंद्र सावंत, इतिहास तज्ञ ज्ञानेश्वर मांद्रेकर, अभिजित  मांजरेकर, रामू मांजरेकर, अरूण मांजरेकर, सुहास पाटिल, महेश मांजरेकर, जैतापूरच्या सरपंच रेखा राजन कोंडेकर, गिरीश करगुटकर, सचिन नारकर, शैलजा मांजरेकर, दिवाकर आडविरकर, जगधिश आडविरकर, प्रदिप मांजरेकर, भाई मांजरेकर, संतोष मांजरेकर, मकरंद मांजरेकर, संतोष आडिवरेकर हजर असतात आणि  देवीचा गोंधळ आनंदात पार पाडतात. देवीचा गोंधळ कार्यक्रम संपल्यावर सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत गोंधळ उत्सवाचा आनंद लुटतात. असा हा भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: