‘ग्लोबल’च्या ट्रकचा आयीत अपघात

Sharing is caring!

दोडामार्ग : वझरेतील ग्लोबल कोक कंपनीचा लोणंदकडे (सातारा) कोळसा घेऊन जाणारा ट्रक आयी येथे अपघातग्रस्त झाला. आयी तिठ्यावरुन गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो न वळता समोरच्या झाडावर जाऊन आदळला आणि थांबला. थोडा पुढे गेला असता तर तो प्रशांत गवस यांच्या घरात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. भरधाव वेग आणि दारुच्या नशेत असलेला चालक याच्यामुळे तो अपघात झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही .                
             दोडामार्ग आयी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात अतिअवजड वाहनांची रात्रीची होणारी बेसुमार  वाहतूक आणि दारूच्या नशेत वाहन चालवणारे चालक यामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव धोक्यात आला आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपुर्वी शिवसेना उपविभागप्रमुख कृष्णा पर्येकर यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षक आणि  तहसीलदारांना निवेदन देऊन  तातडीने  कारवाई करण्याची मागणी केली होती; परंतु  अद्याप कारवाई न केल्याने  श्री पर्येकर यांनी तीव्र नापसंती  व्यक्त केली.
              दरम्यान, त्या कंपनीच्या अवजड वाहनांमुळे यापुढेही कोणताही अपघात होवून जीवित या वित्तहानी झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे सांगून श्री पर्येकर यांनी बाधित गावातील ग्रामस्थांना घेऊन शिवसेनेतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.           
             
प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: