कोकिसरेत भरदिवसा घरात घुसून चोरी

Sharing is caring!

वैभववाडी : कोकिसरे बांधवाडी येथे आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५ वर्षे) या महिलेच्या घरात घुसून एका अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील अंदाजे एकूण १ लाख किमतीची २ मंगळसूत्रे हिसकावून घेतली आणि पलायन केले . ही घटना काल (मंगळवारी) १६ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. 

काल दुपारी, जेवण आटपून आनंदी दत्ताराम नारकर व दत्ताराम गंगाराम नारकर हे दाम्पत्य विश्रांती घेत होते. २:३० वाजण्याच्या सुमारास, अचानक, हेल्मेट घातलेली एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात शिरली. आनंदी नारकर यांना काही कळायच्या आताचं त्या व्यक्तीने तिच्या गळ्यातील अडीज तोळ्यांचे १ आणि अर्ध्या तोळ्याचे १ अशी एकूण सुमारे १ लाख किमतीची २ मंगळसूत्रे हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पलायन केले. नारकर दाम्पत्याने आरडाओरडा केला पण आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीला येण्यापूर्वीच चोरट्याने धूम ठोकली होती. 

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बकरे, बी. बी. चौगुले, राजेंद्र खेडकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळांची पाहणी केली. दरम्यान सौ. नारकर यांनीं पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक या घटनेची माहिती मिळताच लगेच वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत तसेच भर दिवस चोरी झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वैभववाडी.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: