ऐतिहासिक श्री देव कुणकेश्वर चरणी हापूसची आरास

Sharing is caring!

देवगड  : दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या सुमारे ४००० देवगड हापूस आंब्याची आरास ऐतिहासिक शिवकालीन असलेल्या श्री देव कुणकेश्वरचे स्वयंभू शिवलिंग आणि नंदीसभोवताली करण्यात आली. हापूस आंब्यानी केलेल्या आरासमुळे देवदर्शनाला आलेल्या शिवभक्तांना श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र पाहायला मिळाले.
सध्या कोकणात आंब्याचा मौसम सुरू आहे. मात्र वारंवार येणाऱ्या हापूस वरील नैसर्गिक संकटाबरोबर हवामानाचा फटका बसत असतो.  देवगड हापूसचे अर्थकारण बदलावे आणि उत्पनात भरभराट व्ह्यावी, यासाठी स्थानिकांनी लाखोंनी शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याची आकर्षक आरास सजवून देवगड हापूसची भेट अर्पण केली आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून पर्यटक कुणकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. कुणकेश्वर मधील भगवान शंकराच्या पिंडीसभोवताली केलेल्या आकर्षक हापूस आंब्याची आरास पाहून पर्यटकांना सुद्धा प्रसन्न वाटत आहे. कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाचे शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता उदघाटन होणार असून ११ व १२ मे असे सलग २ दिवस पर्यटकांना मेजवानीचा आनंद लुटता येणार आहे.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ देवगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: