“आंबोळगड” एक पर्यटन गाव…

Sharing is caring!

जैतापूर : राजापूर तालुक्यात “आंबोळगड” गाव पर्यटन गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने खुप वर्षापूर्वी घोशीत केले. त्यामुळे आंबोळगड व चित्रपट निर्माते असे एक समिकरणच झाले आहे. या गावात प्रथम दर्शन होते ते शिवकालीन जागृत स्वयंभू नवसाला पावणा-या गणपती बाप्पाचे.

आंबोळगड गावाला निसर्गाची देणगी लाभलेली आहे. या कारणास्तव महाराष्ट्र शासनाने पर्यटन गाव म्हणून घोषीत केले आहे. या गावात प्रथम दर्शन होते ते शिवकालीन जागृत स्वयंभू नवसाला पावणा-या गणपती बाप्पाचे. तसेच महापूरूष देवस्थान, विठ्ठल रखुमाई मंदिर, आंबोळगड किल्ला आणि गगनगिरी महाराजांचा मठ यांचा समावेश आहे. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे महाराजांचे भक्तगण वारंवार येत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या प्रसिध्दित आणखिनच भर पडली आहे.
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि साई पुजा फिल्मचे निर्माते अमोल कोळेकर यांनी आंबोळगड या ठिकांणी चित्रीकरण केले आहे. अमोल कोळेकर यांनी एका गाण्याच्या अल्बमकरीता आंबोळगड जेटी आणि समुद्र किना-याचा पुरेपूर वापर केला आहे. तसेच गाण्याच्या अल्बममध्ये स्थानिक आर्टिस्ट दुष्षन पाथरे आणि शुभांगी गायकवाड यांना संधी दिली आहे. आंबोळगड ग्रामपंचायत महामाई प्रतिभाताई पाटिल यांनी गौरवलेली असून निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार त्यांच्याच हस्ते देण्यात आला आहे.
आंबोळगड ग्रामपंचायत आणि निर्मल सागरतट अभियान अंतर्गत आंबोळगडच्या दोन्ही बिचवर नियमित साफसफाई केली जात आहे. आंबोळगड गाव समुद्रकिनारी असल्याने दिग्गज क्रिकेटर आणि अनेक उच्यप्रभू लोकांनी आपले बंगले आणि माडाच्या बागा किनाऱ्यालगत केल्या आहेत. एम.टि.डी.सी.च्या माध्यमातून रिसॉर्ट उपलब्ध असल्याने पर्यटकांचे वास्तव्य ह्या भागात पहायला मिळते.
किना-याचा विकास करण्याकरीता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून जो निधि मिळाला, त्याचा पुरेपुर वापर करून पर्यटकांसाठी सुविधा आणि लहान मुलांना खेळणी घेऊन उपयोगात आणला. तिन्ही बाजूने समुद्र लाभल्याने तिन्ही समुद्र किना-यावर पर्यटकांसाठी चेजींग रूम, टाॅयलेट, हायमॅक्स् लँप, पिण्याचे पाणी अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आत्ता पर्यटकांची पावले आंबोळगड बिचकडे वळू लागली आहेत. याकरीता आंबोळगडचे सरपंच राजा पारकर, सर्व सदस्य, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक राजेंद्र राऊत आणि निर्मल सागर तट अभियानचे सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.

सचिन नारकर कोकण नाऊ, जैतापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: