अणसुरे पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री देव गिरेश्वर 

Sharing is caring!

जैतापूर : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालूक्यात  पश्चिमेकडे रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या अणसुरे गावचे  ग्रामदैवत  श्री देव गिरेश्वरचा वार्षीक यात्रौत्सव आठ डिसेंबरला साजरा होत आहे. यात्रेच्या वेळी लोटांगण घालणे, दरबार झाडणे हे नवस फेडण्याकरीता भाविक येथे  येतात. तसेच दोन पालख्याचा प्रदक्षिणा सोहळा नेत्रदिपक असतो. त्याचवेळी मंदिराचा जिर्णोध्दार होत असल्यान जिर्णोध्दार समितीने  सढळ हस्ते मदतीचे आवाहन देखिल केले  आहे.
श्री देव गिरेश्वर मंदिर पर्वतवजा टेकडीवर वसलेले आहे. बारा वाड्याच जागृत देवस्थान म्हणून श्री देव गिरेश्वरची ख्याती आहे.  खरं म्हणजे गिरिवर बसणारा गिरेश्वरसुद्धा पूर्वापार गिरेश्वर या नावानेच हे देवस्थान प्रसिद्ध आहे. समोर विशाल सागर त्यात दिमाखात उभा असलेला विजयदुर्ग किल्ला. अशा मंदिराजवळून मोकळ्या वाऱ्यावर  पंचक्रोशिचे दर्शन घेताना तहान भूक विसरावी असा हा परिसर आहे. शिणलेल्या माणसाचा थकवा इथे आल्यावर दूर न झाला तरच नवल. गिरेश्वराचे मंदिर पश्चिमाभिमुख  असून देवळा भोवती तटबंदि आहे. त्याला पोअळ अस संबोधले जाते. विजयदुर्ग किल्याच्या दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे. सूर्य अस्ताला जातांना गिरेश्वर मंदिरा जवळून सायंकाळी दिसणारे दृष्ष मनोहारी असते.     यंदा आठ डिसेंबरला  या मंदिराचा यात्रोउत्सव आहे. दर वर्षी महाराष्ट्रातून भाविक या यात्रौ उत्सवाला हजेरी लावतात आणि  आपले लोटांगण तसेच दरबार झाडणीचे नवस फेडतात.  त्याच वेळी दोन पालख्याचा  प्रदक्षिणा सोहळा नेत्र दिपक असतो. यात्रेच्या पूर्वी समराधना केली जाते.  समराधना म्हणजे नेमकं काय हे सांगताहेत इथले ब्राह्मण पुजारी.
यात्रे नंतर गाव गाऱ्हाणी घातली जातात.  श्रावणी सोमवार, दसरा, महाशिवरात्र असे उत्सव होत असतात. यात्रे दिवशी नाट्यप्रयोग, कीर्तन, भजन केली जातात. श्री देव गिरेश्वरच्या छायेत  अणसुरे वासीय सलोख्याने राहतात. पुरातान मंदिराचा जिर्णोध्दाराचे काम सध्या  सुरू आहे. जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष संतोष गावकर यांनी मंदिरा विषयी  माहिती देतानाच  जिर्णोध्दारा करीता भाविकांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी असं  आवाहन केले आहे.

आर्थिक मदतीने देवस्थानाला पाठबळ मिळाले तर जिर्णोध्दार बरोबरच परिसर सुशोभित करून देवस्थान रमणिय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. या करीता शासनस्तरावर  पाठपुरावा सुरू आहे,  असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात  आले. सढळ हस्ते मदती करीता श्री देव गिरेश्वर देवालय ट्रस्ट अणसुरे जिर्णोध्दार समिती या नावे बँक आॅफ इंडिया शाखा मिठगवाणे IFSC कोड BKID 0001437 खाते नंबर 143710110000627 या खात्यावर आर्थिक मदत करण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे. मंदिराची वेबसाईट www.devgireshwar.co.in , ही आहे. तर devgireshwar@gmail.com हा ईमेल आयडी आहे. मंदिर जिर्णोद्धारच्या  निधि संकलनासाठी ट्रस्टचे सदस्य रमेश सावंत, अशोक गावकर, अरविंद रसाळ, सिध्दी गिरकर, शशिकांत दांडेकर, कालीदास पंगेरकर, प्रमोद गावकर, किशोर पंगेरकर, रामचंद्र कणेरी तसेच अणसुरे गावच्या सरपंच शितल पंगेरकर राजापूर पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर आणि  ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.

सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: